Chinchwad : आद्य कांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात

एमपीसी न्यूज – आद्य कांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 224 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लोकप्रबोधिनी कला मंच आणि सर्व मंगल मांगल्ये परिवाराकडून यानिमित्त मंगळवारी सायंकाळी क्रांतिवीर चापेकर बंधू समूह शिल्पापासून ते चिंचवड स्टेशन येथील लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यापर्यंत कांती मशाल मोर्चा काढण्यात आला.

क्रांती मोर्चा नंतर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्याभोवती 224 दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. आज (बुधवारी) क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी लोकप्रबोधिनी कला मंचचे अध्यक्ष आसाराम कसबे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत अधिकारी प्रकाशराव मीठभाकरे, मिलिंद देशपांडे, विलास लांडगे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह अॅड. सतीश गोरडे, सहकार्यवाह रवींद्र नामदे, नगरसेविका अनुराधा गोरखे आदी उपस्थित होते.
लोकप्रबोधिनी कला मंचच्या वतीने मराठवाड्यातील सुप्रसिद्ध खिचडी व कढी यांचे अन्नदान करण्यात आले. हिंगोली येथून सुनील गायकवाड आणि कैलास वाघमारे हे खास खिचडी तयार करण्यासाठी आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी मोरे, तानाजी साठे, शिवाजी पोळ, गणेश कांबळे, प्रशांत तेलंगे, राजेश अडसूळ, योगेश लोंढे, अनिल सौंदडे, अविनाश कोंबीकर, महेश खिलारे, अरुण जोगदंड, गणेश साठे आदींनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.