Chinchwad : शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड लाखाचे गंठण हिसकावले 

Hinjawadi Crime News

एमपीसी न्यूज – शतपावली करणाऱ्या (Chinchwad) महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 13) रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली. 

याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी वरील दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथे शतपावली करत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून (Chinchwad) आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत. 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share