Chinchwad : श्री. शिवछत्रपती विद्यालयाचा इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल

एमपीसी न्यूज – चिंचवडच्या श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल लागला आहे. १० वी बोर्ड परीक्षेत विद्यालयाचे ६७ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुणांनी घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झाले आहेत. तसेच १६४ विद्यार्थी ७५ ते ९० टक्के दरम्यान गुण घेवून उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयातून प्रथम सहा क्रमांकाचे मानकरी :
१) प्रणन इंदोरे ९७.८० टक्के, २) वैष्णवी भोर ९७.४० टक्के,३) गौरी पाटील ९६.००टक्के,४) साक्षी पवार ९५.८० टक्के,५) अक्षदा घाडगे ९५.८० टक्के,६) मेघना काजुलकर ९५.६० टक्के

  • सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब जाधव, संचालक अमित बच्छाव, संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षकवृंद परीवार व आदींनी अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.