Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात होणार शंभरावे नाट्य संमेलन

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषेदेच्या वतीने (Chinchwad) 100वे नाट्यसंमेलन पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. ही पिंपरी चिंचवड शहरातील नाट्य रसिकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. हे नाट्य संमेलन 6 आणि 7 जानेवारी रोजी शहरातील सर्व नाट्यगृहांमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. जब्बार पटेल हे भूषवणार आहेत. संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार असतील. स्वागत समिती अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे असून उद्योग मंत्री उदय सामंत हे संमेलनाचे प्रमुख निमंत्रक असतील.

भाऊसाहेब भोईर म्हणाले, “सन 1999 साली 79 व्या नाट्यसंमेलनाचे यजमानपद पिंपरी-चिंचवड शाखेला मिळाले होते. सन 2019 मध्ये 99वे नाट्यसंमेलन झाले. त्यानंतर चार वर्षांनी 100 वे नाट्य संमेलन होत आहे. 100वे नाट्यसंमेलन आयोजित करण्यासाठी अनेकांची मागणी होती. मात्र तो मान पिंपरी-चिंचवडला मिळाला आहे. हे नाट्यसंमेलन खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.”

प्रमुख संमेलन हे मोरया गोसावी क्रीडांगण, चिंचवडगाव येथे होणार आहे. संमेलनाची सुरुवात नाट्यदींडीने व शोभा यात्रेने होणार आहे. या नाट्यदिंडीत लोककलांचे सादरीकरण करणाऱ्या कलाकारांपासून ते नाट्य क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या नाट्यकलावंतांचा सहभाग असणार आहे. नाट्यदिंडीमध्ये चित्ररथ आणि विद्यार्थ्यांचा देखील( (Chinchwad) सहभाग असणार आहे. सांगली येथे प्रथम नटराजाच्या मूर्तीचे पूजन होईल.

त्यांनतर ती मूर्ती पुणे शाखेत आणली जाईल. तिथे पूजन झाल्यानंतर उद्घाटन सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड शाखेकडे ती नटराजाची मूर्ती दिली जाणार आहे. नाट्यसंमेलनाची सुरुवात पिंपरी-चिंचवड शहरात तर समारोप रत्नागिरी येथे होणार असल्याचेही भोईर यांनी सांगितले.

पिपरी चिंचवड शहरातील असणाऱ्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह आणि त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र मैदान, भोईर नगर, चिंचवड येथील मैदानावर बालरंगभूमी द्वारे बालनाट्य सादरीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

Chikhali : पिस्टल व जिवंत काडतुसासाह एकाला चिखली येथून अटक

दोन दिवस संपन्न होणाऱ्या या नाट्य संमेलनामध्ये विविध व्यावसायिक नाटके, महाराष्ट्र राज्यस्तरीय हौशी मराठी नाट्य स्पर्धेत गाजलेल्या विविध नाट्य प्रयोग, प्रायोगिक नाटके, नाट्यछटा, एकपात्री प्रयोग, एकांकिका, कीर्तन, लोककला, महाराष्ट्रात गाजलेल्या विविध लावणी सम्राज्ञींचा लावणी महोत्सव, संगीत व नृत्य विषयक कार्यक्रम, बालनाट्य व संबंध महाराष्ट्रभरातील स्पर्धामध्ये नावाजलेल्या, उल्लेखनीय एकांकिका व नाटकांचे प्रयोग अशा एकूण 64 नाट्य कलांचे सादरीकरण होणार आहे. पिंपरी चिंचवड मधील आबालवृद्ध रसिकांसाठी ही एक सांस्कृतिक पर्वणी असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.