Chinchwad : दहावी बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा नगरसेविका मीनल यादव यांच्यातर्फे सत्कार

एमपीसी न्यूज- युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. 20) शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांच्या वतीने 10 वी व ‍12 वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

मोहननगर येथील जिजामाता सांस्कृतिक भवनामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेना विभागप्रमुख नानासाहेब काळभोर, प्रभागातील शिक्षक विनया जोशी, रंजनीताई लिंगे, सतीश मेहेर, ऍड . दिलीप निंबाळकर, अर्चनाताई धुमाळ, चरणसिंग बुतर आदी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा आयआयटीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला कु. अभय शिरसाट तसेच मेडिकल मध्ये 99 टक्के मार्क मिळालेली कुमारी रुतुजा वनमाने यांच्या सहित प्रभागातील 157 विद्यार्थ्यांचा फाइल फोल्डर, श्रीफळ, शाल देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

स्वागत शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव यांनी केले. सूत्रसंचालन काका शेळके यांनी केले तर आभार नगरसेविका मीनल यादव यांनी मानले .
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव व शिवसेना शाखा मोहननगर यांच्यावतीने करण्यात आले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.