Chinchwad : आचारसंहितेचे उल्लंघन करणा-या 117 जणांवर गुन्हे

एमपीसी न्यूज – देशात आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेचे उल्लंघन करणा-यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. विनाकारण घराबाहेर चालत, वाहनातून फिरणा-या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन करणा-या दुकानदारांवर देखील गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. बुधवारी (दि. 1) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 117 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

संचारबंदी सुरु असताना नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांचा पुरवठा नियमितपणे सुरु आहे. त्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडता येईल. घरातील केवळ एका व्यक्तीने घराबाहेर पडून जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्यात. हे करत असताना देखील नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे. प्रशासनाला एकाच ठिकाणी गर्दी आढळून आल्यास त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई केली जात आहे.

केक घेऊन जात असताना पोलिसांशी हुज्जत घालणा-या दोन तरुणींवर वाकड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस विनंती करीत आहेत. हातात काठी घेऊन, दमबाजी करूनही नागरिकांना समजावत आहेत. याचा फरक न पडल्यास प्रतिबंधात्मक कारवाई आणि शेवटी गुन्हे देखील दाखल करत आहेत. तरीही नागरिक रस्त्यावर येताना दिसत आहेत. पोलिसांनी देखील अशा नागरिकांवर कारवाई सुरूच ठेवली आहे.

बुधवारी दाखल झालेले गुन्हे –

पिंपरी – 01
चिंचवड – 03
निगडी – 03
देहूरोड – 05
तळेगाव दाभाडे – 14
तळेगाव एमआयडीसी – 05
चिखली – 04
सांगवी – 05
वाकड – 48
हिंजवडी – 04
भोसरी – 05
एमआयडीसी भोसरी – 03
दिघी – 07
चाकण – 05
आळंदी – 05
एकूण – 117

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.