Chinchwad: आनंदनगर झोपडपट्टीत अवघ्या 12 दिवसात 120 कोरोनाबाधित, जाणून घ्या तुमच्या भागातील रुग्णसंख्या…!

Chinchwad: 120 corona affected in just 12 days in Anandnagar slum

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड मधील चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे.  अवघ्या 12 दिवसात झोपडपट्टीतील तब्बल 120 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रसार वेगात झाला आहे. दररोज नवीन रुग्ण सापडत असल्याने ही परिस्थिती नियंत्रण आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी शहरातील पहिली घोषित झोपडपट्टी आहे. सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये तिची गणना केली जाते. या झोपडपट्टीत 13 मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने झाला. झोपडपट्टीत दररोज नवीन रुग्ण सापडत आहेत. बघता-बघता बाधितांची संख्या 100 च्या पुढे गेली. अवघ्या 12 दिवसात झोपडपट्टीतील 120 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

दररोज नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे झोपडपट्टीतील रुग्ण संख्या आटोक्यात आणणे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय प्रभाग हद्दीत कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 123 रुग्ण आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय रुग्ण संख्या!

‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर,  मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात सर्वाधिक 123 रुग्ण आहेत. हा प्रभाग कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ झाला आहे. प्रभागातील आनंदनगर झोपडपट्टीतील 120 जण बाधित असून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत,  किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात आठ सक्रिय रुग्ण आहेत.

‘क‘ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे चार रुग्ण आहेत.

‘ड’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे 12 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे 12 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली,  कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर,  यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे सहा सक्रिय रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे आठ सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे सर्वात कमी म्हणजेच चार रुग्ण आहेत.

शहरात एकूण 177 सक्रिय रुग्ण  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.