Chinchwad Crime News : प्रशासनाच्या आदेशाला पायदळी तुडवणा-या 133 जणांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन न करणा-या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. रविवारी (दि. 11) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या आदेशांना पायदळी तुडवून त्याचे उल्लंघन करणा-या 133 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ दुकाने सुरु ठेवल्यास, दुकानासमोर गर्दी करून कोरोना साथीचा प्रादुर्भाव पसरविण्यासाठी पोषक वातावरण तयार केल्यास कारवाई केली जात आहे.

विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या तसेच मास्क न वापरणा-यांवर आर्थिक दंड आकाराला जात आहे. दंड न भरल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रविवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी (4), भोसरी (1), पिंपरी (5), चिंचवड (9), निगडी (1), आळंदी (13), चाकण (7), दिघी (2), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (7), वाकड (36), हिंजवडी (5), देहूरोड (3), तळेगाव दाभाडे (4), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (12), रावेत चौकी (10), शिरगाव चौकी (12)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.