Chinchwad: महायुती, महाआघाडीच्या उमेदवारांसह 19 जणांचे अर्ज दाखल; उद्या होणार अर्जांची छाननी

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे प्रशांत शितोळे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. एकूण 19 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची उद्या (शनिवारी) छाननी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी 27 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज (शुक्रवारी) अंतिम मुदत होती. या मुदतीत 19 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले आहेत.

‘यांनी’ दाखल केले अर्ज
भाजप-शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप, जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी देखील भाजपकडून अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे प्रशांत कृष्णराव शितोळे यांनी अर्ज भरला आहे. बहुजन समाज पार्टीकडून राजेंद्र माणिक लोंढे, विजय निवृत्ती वाघमारे या दोघांनी अर्ज दाखल केले आहेत. जनहित लोकशाही पार्टीचे नितीश दगडू लोखंडे, बहुजन मुक्ती पार्टी एकनाथ नामदेव जगताप, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश भाऊराव घोडके, भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महावीर ऊर्फ अजित प्रकाश संचेती, जनता पार्टीचे राजकुमार घनश्याम परदेशी, भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती चंद्रकांत देसले यांनी पक्षाकडून अर्ज दाखल केले आहेत.

‘यांनी’ अपक्ष अर्ज भरले
शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी देखील बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. धर्मपाल यशवंतराव तंतरपाळे, सुरज अशोकराव खंडारे, डॉ. मिलिंदराजे दिगंबर भोसले, राजेंद्र मारुती काटे, जावेद रशिद शेख, कैलास दशरथ परदेशी, रवींद्र विनायक पारधे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. एकूण 19 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.