Chinchwad : घरफोडी करून 27 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 27 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 3 जून रोजी सकाळी आठच्या सुमारास चिंचवड येथे उघडकीस आली.
किसन भगवान घोरपडे (वय 45, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन, त्यांची पत्नी रंजना आणि लहान मुलगा अर्जुन असे तिघेजण मिळून सोलापूर येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. 1 जून रोजी त्यांचा मोठा मुलगा करण घराला कुलूप लावून रेल्वेच्या परीक्षेसाठी नाशिक येथे गेला.
त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून आठ ग्राम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि सात हजार रुपयांची रोकड असा एकूण 27 हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. 3 जून रोजी किसन लग्नाहून परत आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याबाबत गुन्हा दाखल केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.