Chinchwad : ड्रीम टच ट्रेड इंडिया प्रा, लि कंपनीचा शुक्रवारी द्वितीय वर्धापन दिन

एमपीसी न्यूज- सेंद्रिय शेती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चिंचवडमधील ड्रीम टच ट्रेड इंडिया प्रा, लि. कंपनीचा दुसरा वर्धापन दिन उद्या, शुक्रवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती कंपनीचे संस्थापक अध्यक्ष विकास विठ्ठल बेंगडे आणि लीगल डायरेक्टर जनार्दन कारभारी यांनी दिली.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणाऱ्या कार्यक्रमाला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, महेश लांडगे, नरेंद्र पवार, माजी नगरसेवक राजेश पिल्ले तसेच हजारो शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

कंपनीच्या वतीने प्रत्येक गावात ई कॉमर्स अंतर्गत ग्राहक सेवा केंद्र सुरु केले जाणार असून त्यामाध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. या कार्यक्रमात शेती विषयक उत्पादने सुरु केली जाणार असून शेती विषयक मासिक सुरु केले जाणार आहे. असे बेंगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.