Chinchwad : पदाचा गैरवापर करत कंपनीच्या कार्डद्वारे केला 48 लाख 57 हजारांचा अपहार

एमपीसी न्यूज – चिंचवड (Chinchwad) येथील एस के एफ इंडिया कंपनीने डेप्यूटी मॅनेजमेंट पदाचा गैरवापर करत कंपनीच्या क्रेडीटकार्डद्वारे तब्बल 48 लाख 57 हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी डेप्यूटी मॅनेजरलां पोलिसांनी अटक केली आहे.

योगेश मोहनराव भोसले (वय 37, रा.थेरगाव) अटक केलेल्या मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीचे रोहन रामचंद्र फडके (वय 38, रा.वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.

Sidhu Moose Wala Murder : गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी (Chinchwad) हा एस के एफ इंडिया या कंपनीच्या डेप्यूटी मॅनेजर प्रशासन व सुविधा या पदावर काम करत होता. त्याने पदाचा गैर फायदा घेत कंपनीच्या एचएसबीसी बँकेच्या केड्रीट कार्डद्वारे 48 लाख 57 हजार 279 रुपयांचा अपहार केला आहे. हा अपहार 6 एप्रिल 2020 ते 6 ऑक्टोबर 2022 या दोन वर्षाच्या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात कंपनीची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून भोसले याचा अटक केली आहे. चिंचवड पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.