Chinchwad : ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ च्या ऑनलाईन ‘ध्यान व श्वास’ शिबिराचा 500 पोलिसांनी घेतला लाभ 

500 police participated in The Art of Living's online meditation and breathing camp एकूण सहा सत्रात घेतलेल्या या शिबीरात 500 पोलिसांनी सहभाग घेतला होता. 

एमपीसी न्यूज – द आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत पिंपरी चिंचवड पोलिसांकरिता मोफत ध्यान व श्वास ऑनलाईन शिबिराचे आयोजन केले होते. सहा सत्रात घेतलेल्या शिबीराचा 500 पोलिसांनी घेतला लाभ घेतला. 

या शिबीरा दरम्यान, पोलिसांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, तणावमुक्त, निरोगी व आनंदी जीवनासाठी योग, प्राणायाम, ध्यान याच्यासह जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया शिकवण्यात आली. एकूण सहा सत्रात घेतलेल्या या शिबीरात 500 पोलिसांनी सहभाग घेतला होता.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई व पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिलेल्या ग्याजेट पत्र द्वारे भरपूर पोलिसांनी सहभाग नोंदवला होता. शिबीर आयोजनासाठी पोलीस निरीक्षक नंदराज गबाले व शिपाई दादासाहेब घोडके आणि आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक राजेंद्र गायकवाड, सचिन नाईक व  आर्ट ऑफ लिव्हिंग राज्य समन्वयक सुनील पोद्दार ह्यांनी पुढाकार घेतला.

शिबीरासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक रोहिणी ओक, राजेंद्र गायकवाड, सचिन नाईक, राहुल पटेल, विद्या शिर्के, गौरव डोग्रा, शगुन पंडित, तुषार अल्हाट, अनघा अथळे, दीपिका सुर्वे, माधुरी सावंत, बाळासाहेब बिचुकले यांनी परिश्रम घेतले.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षकांचा कौतुक प्रमाणपत्र आणि पुरस्कार देऊन सम्मान केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.