Chinchwad : 62 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे दिमाखात उदघाटन

एमपीसी न्यूज – सांस्कृतिक संचालनालाय, महाराष्ट्र शासन आयोजित 62 व्या (Chinchwad)हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे काल रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे आमदार सौ. उमाताई खापरे यांच्या हस्ते मोठया दिमाखात उदघाटन झाले.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर हेदेखील उपस्थित होते. तसेच शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी नरेंद्र आमले, गौरी लोंढे तसेच या स्पर्धेचे परीक्षक सुधाकर पाटील, चंद्रकांत अत्रे आणि उमेश घळसासी आणि या स्पर्धेचे केंद्र समन्वयक राजेंद्र बंग उपस्थित होते.
Alandi : पाण्यात उभे राहून राष्ट्रगीत गात वेधले इंद्रायणी प्रदूषणाकडे लक्ष
चिंचवड केंद्रावरील या स्पर्धेचे हे दहावे (Chinchwad)वर्ष आहे. याप्रसंगी उपस्थित रंगकर्मीना शुभेच्छा देताना सौ. खापरे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक शहर असण्याबरोबरच सांस्कृतिक शहरदेखील आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा या शहरातील सांस्कृतिक चळवळ गतिमान करण्यास खूप मोठा हातभार लावण्यास उपयुक्त ठरतात.
भाऊसाहेब भोईर याप्रसंगी बोलताना म्हणाले की, या स्पर्धेचे चिंचवड केंद्र चालू होण्यासाठी नाट्य परिषदेने मोठया प्रमाणावर प्रयत्न केले आहेत. त्यामुळे स्थानिक कलाकारांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे स्थानिक कलाकार तसेच शहरातील नाट्य प्रेमिनी या स्पर्धाचा पुरेपूर उपभोग घ्यावा.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील याप्रसंगी सर्व स्पर्धेकांना ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने शासनाचा 75 वेगवेगळ्या शहरात नाट्यगृहे उभारण्याचा मनोदय आहे.
त्याचप्रमाणे स्पर्धेत सहभागी रंगकर्मीच्या विविध मागण्यांचा संवेदनशीलपणे विचार करण्याचे आश्वासन देखील त्यांनी याप्रसंगी दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज डाळीम्बकर यांनी केले.