Chinchwad: मास्क न वापरणा-या 16 जणांवर दंडात्मक कारवाई

आठ हजार रुपये दंड वसूल

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मास्क परिधान करणे क्रमप्राप्त केले असतानाही अनेकजण मास्कचा वापर करत नाहीत. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य अधिका-यांनी मास्कचा वापर न करणा-या 16 जणांवर शुक्रवारी (दि.24) दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे आठ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक नागरिक  सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मास्कचा वापर न करणा-यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. त्यानुसार कारवाईला सुरुवात केली आहे.

‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 24 मधील डांगे चौक परिसरामध्ये काही नागरिक मास्क न घातलेले आढळून आले. अशा 16 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे आठ हजार रुपये दंड वसूल केला. ही कारवाई सहायक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक बेद यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक एस. बी. चन्नाल, प्रभारी आरोग्य निरीक्षक धनेश्वर थोरवे, मुकादम दिलीप खताळ, कर्मचारी अभय दारोळे, प्रशांत पवार, अरुण राऊत ,अनिल डोंगरे, सूर्यकांत चाबूकस्वार यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.