Chinchwad : लॉकडाऊनसह सहा महिन्यात 906 जणांची ऑनलाईन फसवणूक; 59 गुन्हे दाखल

मार्चपासून जूनपर्यंत लॉकडाउन होता. त्यामुळे सर्वत्र ऑनलाईनचा वापर वाढला होता. : 906 people cheated online in six months with Lockdown; 59 cases filed

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – मागील सहा महिन्यात पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडे ऑनलाईन फसवणुकीच्या एकूण 906 तक्रारी आल्या आहेत. यातील 684 तक्रार अर्ज संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. या तक्रारीवरून एकूण  59 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत हे सायबर गुन्हे घडले आहेत. या मध्ये मार्चपासून जूनपर्यंत लॉकडाउन होता. त्यामुळे सर्वत्र ऑनलाईनचा वापर वाढला होता.

सायबर चोरटयांनी ऑनलाइन चोऱ्यांचा सपाटा लावला आहे. पासवर्ड हॅक करणे, ऑनलाईन बॅंकिंग आणि जॉब फ्रॉड, लॉटरी, एटीएम स्कीमिंग, नायजेरियन फ्रॉडसारखे ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत.

सायबर गुन्हेगार वारंवार आपली गुन्हे करण्याची पद्धत (मोडस ऑपरेंडी) बदलत असल्याने पोलीस हतबल झाले आहेत.

सायबर सेलकडे दररोज वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. सायबर चोरटयांनी हजारो मैलावरून वापरलेले नवनवीन फंडे पाहून पोलिसही चक्रावून जात आहेत. सायबर गुन्ह्यांचा निपटारा करणे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

सायबर चोरटयांनी अलीकडच्या काळात नागरिकांना गोंधळात टाकून पैसे हडपण्याची नवीन ट्रिक शोधून काढली आहे. यामध्ये चोरटे बँकेतून अथवा एखाद्या ऑनलाईन खरेदी- विक्रीच्या साईटवरून बोलत असल्याचे सांगून नागरिकांवर प्रश्नांचा भडीमार करतात.

त्यामुळे नागरिक गोंधळून जातात व चोरटा म्हणेल तसे करतात. अशा प्रकारे फसवणूक होण्याचे प्रमाण जास्त आहे.

सायबर चोरटे ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅकची भुरळ घालतात. कंपन्यांचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून चोरटे गोपनीय माहिती विचारून घेतात. तसेच, क्युआर कोड स्कॅन केल्यास तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असे सांगितले जाते.

त्यानुसार ग्राहकाने गोपनीय माहिती किंवा क्युआर कोड स्कॅन केल्यास बँक खात्यातील पैसे परस्पर हस्तांतरित केले जातात.

आर्थिक व्यवहारात पैसे देणारा हा PAYER आणि घेणारा PAYEE असतो. क्यूआर कोडचा वापर करून होणाऱ्या आर्थिक व्यवहारात पैसे स्वीकारण्यासाठी  ‘क्यूआर’ कोड स्कॅन करण्याची गरज लागत नाही.

मात्र, तरी देखील नागरिक गोंधळून मोबाईलवर आलेला क्यूआर स्कॅन करतात. त्यामुळे क्यूआर कोड देताना किंवा स्कॅन करताना दक्षता घ्यायला हवी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मोबाईलमध्ये वापरत असलेल्या ऍपची मुदत संपली असून त्यासाठी केवायसी डॉक्युमेंट अपडेट करण्याच्या बहाण्याने देखील मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी फोनवर आपली माहिती न देण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

गुगलवर संपर्क क्रमांक सर्च केल्यानंतर स्क्रीनवर येणारे मोबाईल क्रमांक डायल करण्यापूर्वी खात्री करा. कारण हे मोबाईल क्रमांक सायबर चोरट्यांचे देखील असून शकतात. या मोबाईल क्रमांकावर फोन केल्यानंतर बँक खात्याची कोणतीही माहिती देऊन नका.

आत्तापर्यंत अनेकांना सायबर चोरटयांनी अशा प्रकारे गंडा घातला आहे. त्यामुळे गुगलवर एखाद्या दुकानाचा किंवा संस्थेचा संपर्क क्रमांक शोधणे महागातही पडू शकते.

स्पेलिंगमध्ये किरकोळ बदल करून फेक मेलद्वारे देखील सायबर चोरटे फसवणूक करीत आहेत. अशा प्रकारे चोरटयांनी मोठे हात मारले आहेत. त्यामुळे मेलला रिप्लाय करताना मेलची शहानिशा करा. तसेच, मेलवर पेमेंट डिटेल्स किंवा अन्य गोपनीय माहिती देऊ नये.

सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव म्हणाले, “संशियत व्यक्तींनी फोन केल्यास त्यांना गोपनीय माहिती देऊ नका. तसेच, एखादा फोन आल्यास गोंधळून न जाता समोरचा नेमका काय करण्यास सांगत आहे, यावर लक्ष द्यावे. कोणतीही बँक अथवा संस्था फोनवर क्यूआर कोड स्कॅन करण्यास किंवा गोपनीय माहिती देण्यास सांगत नाही. त्यामुळे नागरिकांनी देखील जबाबदारीने वागण्याची गरज आहे.”

हिंजवडी – 54

वाकड – 79

सांगवी – 83

चिंचवड – 69

पिंपरी – 72

चिखली – 39

निगडी – 62

दिघी – 3

आळंदी – 13

चाकण – 25

भोसरी – 53

भोसरी एमआयडीसी – 29

देहूरोड – 49

तळेगाव दाभाडे – 24

तळेगाव एमआयडीसी – 02

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.