chinchwad : नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरूच; गुरुवारी 101 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – सरकारी आदेशाचे उल्लंघन करून दुकाने सुरु ठेवणा-या तसेच विनाकारण घराबाहेर घुटमळणा-या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे. दररोज दुकानदार आणि नागरिकांवर कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात असताना देखील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत नाहीत. गुरुवारी (दि. 2) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 101 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

संपूर्ण भारत देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य, जिल्हा आणि शहरांच्या देखील सीमा सील करण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणा-या यंत्रणा सुरु आहेत. त्यांना देखील प्रशासनाकडून विशेष परवानगी घेऊन प्रवास तसेच हालचाली कराव्या लागत आहेत. अनेक नागरिक शहरात जिथल्या तिथे अडकून पडले आहेत. त्यातील बहुतांशजण आपापल्या गावाकडे जाण्याच्या तयारीत आहेत.
शहरातील हे भकासपण त्यांना शहरात राहण्यासाठी धोकादायक वाटत आहे. शहर आणि जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने सीमेवर नागरिकांना अडवून त्यांना तिथेच राहण्याची अथवा मागे फिरण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. बहुतांश ठिकाणी पोलीस यंत्रणा लाठी तंत्रा वापर करीत आहेत. नागरिकांच्या समस्या समजून घेण्यापूर्वीच नागरिकांना लाठीचा प्रसाद दिला जात आहे. यामुळे देखील नागरिकांमध्ये रोषाची भावना निर्माण होत आहे.
मात्र, संचारबंदी लागू असताना असताना अत्यावश्यक वस्तू आणि सेवा घेण्याव्यतिरिक्त घराबाहेर पडणे, तसेच विनाकारण सार्वजनिक ठिकाणी घुटमळणे हा गुन्हा आहे.तसेच जिल्हाधिका-यांनी संपूर्ण जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणा-या दुकानांच्या व्यतिरिक्त अन्य दुकाने, मॉल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांना झुगारून अनेक दुकानदार मागल्या दाराने दुकाने सुरु ठेऊन दैनंदिन व्यवहार करीत आहेत. अशा दुकानदारांवर कारवाई केली जात आहे.सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येते.
गुरुवारी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात 101 जणांवर कारवाई करण्यात आली.
पिंपरी – 04
चिंचवड – 03
निगडी – 00
चिखली – 00
देहूरोड – 10
तळेगाव दाभाडे – 00
तळेगाव एमआयडीसी – 00
सांगवी – 20
वाकड – 19
हिंजवडी – 05
भोसरी –  05
एमआयडीसी भोसरी – 04
दिघी – 06
आळंदी – 09
चाकण – 16
एकूण – 101

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.