Chinchwad : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पती आणि सासूने विवाहितेच्या चारित्र्यावर (Chinchwad) संशय घेत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला आहे. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती योगेश अशोक मोरे (वय 34, रा. चिंचवड. मूळ रा. बुलढाणा) आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2018 ते 20 फेब्रुवारी 2023 या कालावधीत वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडला.

Dehuroad : किरकोळ कारणावरून तरुणास बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि योगेश मोरे यांचा फेब्रुवारी 2018 मध्ये विवाह झाला. लग्नानंतर योगेश याने फिर्यादी यांना पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. लग्न झाल्यानंतर एका महिन्याने सासूने फिर्यादीचा छळ करण्यास सुरुवात केली.

सासूच्या सांगण्यावरून पतीने विवाहितेस (Chinchwad) शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली. फिर्यादीने पतीकडे घर खर्चासाठी पैसे अथवा स्वतः कामावर जाण्याची परवानगी मागितली असता ती दिली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.