BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : मोहननगर येथे खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग!; अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना

0

एमपीसी न्यूज – मोहननगर येथे एका खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग लागली. हा प्रकार आज (मंगळवारी) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडला. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. मात्र, कंपनीच्या आवारात जाण्यासाठी रस्ता नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोहननगर येथे चिंचवड एमआयडीसी कार्यालयाच्या समोर संघवी कंपनी आहे. मागील काही वर्षांपूर्वी या कंपनीचे विभाजन होऊन त्यात काही भाग करण्यात आले आहेत. मात्र, ही कंपनी मागील काही दिवसांपासून बंद आहे. कंपनीच्या बाजूला नाईट स्कूल, जैन स्थानक आणि रहिवासी सोसायट्या आहेत. संघवी कंपनीच्या कंपाउंडमध्ये आतल्या बाजूला हा आगीचा प्रकार घडला आहे.

आगीच्या ठिकाणी तात्काळ पोहोचता येत नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, परिसरातील काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. आगीची घटना घडल्यानंतर तात्काळ नाईट स्कूल सोडून देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत. कंपनीच्या कंपाउंडच्या आत जाण्याचा मार्ग तयार करून आगीवर नियंत्रण मिळवले जात आहे.

 

HB_POST_END_FTR-A2

Advertisement