Chinchwad : पूर्ववैमनस्यातून जिम ट्रेनरचा टोळक्याकडून खून

Chinchwad: A gym trainer murdered by a gang out of prejudice मध्यरात्री चिंचवडेनगर येथील थरारक घटना

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणाच्या रागातून नऊ जणांच्या टोळक्याने मिळून एका जिम ट्रेनर तरुणाचा शस्त्राने वार करून खून केला. ही घटना काल शुक्रवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास बळवंतनगर, चिंचवडेनगर येथे घडली.

प्रेम सायबू लिंगदाळे (वय 21, रा. चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मॅडी मडिवाल, राकेश सूर्यवंशी, गणेश खांगटे, गणेश कांबळे, किरण बाबासाहेब चव्हाण (वय 21, रा. चिंचवडेनगर), योगेश फुरडे, दीपक शरद कोल्हे (वय 29, रा. बिजलीनगर, चिंचवड), सागर परीट, अनंत अजिनाथ साठे (वय 27, रा. चिंचवडेनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी अनंत, दीपक आणि किरण या तिघांना ताब्यात घेतले आहे. शिवानंद शंकर हेळवे (वय 23, रा. चिंचवड) याने या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या तोंड ओळखीचा मॅडी मडीयाल यास फिर्यादी व त्याच्या मित्रांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण करुन त्यांच्या रिक्षाचे नुकसान केले होते. त्याचा राग मनात धरुन मॅडी व त्याचे साथीदार मित्र राकेश सूर्यवंशी, गणेश खांगटे, गणेश कांबळे, किरण चव्हाण, सागर परीट, दीपक कोल्हे, अनंत साठे यांनी बळवंतनगर, चिचवडेनगर येथील बालाजी निवास समोर प्रेम याच्या डोक्यात कोयते व पालघनने सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले. त्यातच प्रेमचा मृत्यू झाला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.