Chinchwad : प्रतिभा ग्रुप ऑफ़ इन्स्टिट्यूटच्यावतीने गरजुंना मदतीचा हात

A helping hand to the needy on behalf of Pratibha Group of Institutes

एमपीसीन्यूज : कोविड -19 महामारीच्यासंकटात समाजातील विविध घटक होरपळत आहेत. अश्या वेळी फक़्त शासकीय मदतीवर अवलंबून न राहता प्रतिभा ग्रुप ऑफ़ इन्स्टिट्यूटचे डॉ. दीपक शहा हे सामाजिक बांधिलकी जपत गोरगरीब आणि गरजू नागरिकांना मदतीचा हात देत आहेत.

कोरोनामुळे लॉकडाऊन लागून झाल्यापासून गेले तीन महिने डॉ. शहा यांनी पिंपरी चिंचवड, तळेगाव अश्या ठिकाणी अन्नदान, धान्य वाटप, पुरोहिताना शिधा वाटप अशाप्रकराचे मदत कार्य चालू ठेवले. या मध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब, प्रतिभा कॉलेजचे शिक्षक वर्ग व त्यांचे लायन्स क्लब सदस्य सहभागी असतात.

डॉ. शहा यांनी लायन्स क्लब तळेगावच्या माध्यमातून तळेगाव येथे ही शेकडो गरजुंना अन्नवाटप केले. नम्रता बिल्डरच्या माध्यमातून सुमारे 1500 बांधकाम मजुरांसाठी धान्य व गरजेच्या वस्तूंचे वाटप केले.

आपल्या शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपले कुटुंबीय समजून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले.

ह्यात लॉक डाउनच्या काळात आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम राबविण्यात आले. ज्यात मुद्रा योगासारखी थेरपी, स्वयंपाक घरातील आयुर्वेद अश्या विविध विषयांची माहिती व सवयी प्रतिभा परिवारामध्ये त्यांनी रुजवल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.