Chinchwad : लावणी परंपरा जपण्यासाठी रंगणार विशेष लावणी महोत्सव

एमपीसी न्यूज़ – महाराष्ट्राची लावणी परंपरा जपण्यासाठी पहिल्यांदाच (Chinchwad) राज्यस्तरीय लवणी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. आमदार उमा खापरे व माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांचा निदर्शना अंतर्गत आयोजन करण्यात आले आहे.

 

अनेक उत्कृष्ट लावण्या पाहण्याची संधी ही सर्व प्रेक्षकांना मोफत मिळणार असून पहिले पारितोषिक 1 लाख रुपयांचे असणार आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्का आकारले जाणार नाही.

 

Alandi : अविरत श्रमदान आणि गडकिल्ले सेवा संस्थेकडून कोटी तीर्थावर श्रमदान

25 व 26 मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 मार्च रोजी महिलांना मोफत प्रवेश सकाळी 9 ते रात्री पर्यंत असणार आहे. लावणी ही वाईट नाही, तसेच महिलांनी (Chinchwad) पण त्याचा लाभ घ्यावा असा हेतू यामधून स्पष्ट होतो.

 

पहिले पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 71 हजार, तृतीय पारितोषिक 51 हजार व उतेजनार्थ 31 हजार असे आहे. तसेच सर्व सहभागी संघाना 20 हजार रुपये दिले जाणार अहेत. त्यातच सर्वोत्कृष्ट गायक/गायिका, ढोलकी वादक, पेटी वादक यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमात आतापर्यंत 15 संघांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार सचिन अहिर व शेखर सिंह उपस्थित असतील. कार्यक्रमाचा पुरस्कार वितरण सोहळा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.