Chinchwad : भरधाव डंपरने दुचाकीला उडवले; दुचाकीस्वार जागीच ठार

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत एम्पायर इस्टेट पुलाजवळ ऑटो क्लस्टरकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला उडवले. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघात झाल्यानंतर डंपरचालक पळून गेला. ही घटना गुरुवारी (दि. 16) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास(Chinchwad)घडली.

योगेश श्रीकांत संगनोर (वय 27) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

Talegaon Dabhade : सासरच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या, पतीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश हा दुचाकीवरून पिंपरी येथून निगडीच्या दिशेने जात होता. एम्पायर इस्टेट सोसायटीच्या पुलाजवळ तो ऑटो क्लस्टरकडे वळला असता भरधाव आलेल्या डंपरने योगेशच्या दुचाकीला(Chinchwad) धडक दिली. दुचाकी डंपरच्या मागील चाकाखाली अडकली. डंपरखाली चिरडल्याने गंभीर जखमी झालेल्या योगेशचा जागीच मृत्यू झाला.अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पिंपरी पोलीस डंपरचालकाचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.