Chinchwad : अकरावीच्या विद्यार्थ्याने शिष्यवृत्तीची रक्कम केली सीएम फंडात जमा

एमपीसी न्यूज – अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने त्याला दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल 10 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. सामाजिक भान जपत त्याने सर्व रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी (सीएम फंड)साठी दिली.

यशराज विलास नढे (रा. काळेवाडी, पिंपरी) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी दहावी मधील गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मान केला जातो.

उत्तम गुणांसह यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिका प्रोत्साहन म्हणून दहा हजार रुपये देते. यशराज याचाही दहा हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला होता.

सध्या कोरोनाने देशात व राज्यात धुमाकूळ घातला आहे. या आजाराचा राज्य सरकार, केंद्र सरकार कसोशीने सामना करत आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्व उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. शासनाला मिळणारा महसूल देखील बंद झाला आहे. मिळकत कमी आणि खर्च जास्त अशी सध्या राज्याची स्थिती आहे. यातून राज्याला सावरण्यासाठी मदतनिधी देण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.

अनेक कंपन्या, संस्था आणि दानशूर हात शासनाला मदत करीत आहेत. त्यात खारीचा वाटा उचलून यशराज याने देखील त्याला मिळालेली शिष्यवृत्तीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊ केली आहे. त्याच्या या सामाजिक वृत्तीचे शहरात कौतुक केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.