Chinchwad: जखमी व्यक्तीला दवाखान्यात जाण्यासाठी मदत केल्याने महिलेचा विनयभंग

Chinchwad: A woman was Molested for helping an injured person to go to the hospital याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमपीसी न्यूज- मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी मदत केल्याच्या रागातून तिघांनी मिळून महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि.27) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमरास आनंदनगर, चिंचवड येथे घडली.

शुभम भास्कर गायकवाड आणि त्याचे दोन मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादीच्या शेजारी राहणा-या एकाचे भांडण झाले. यामध्ये आरोपींनी फिर्यादीच्या शेजारी राहणा-या व्यक्तीला जखमी केले. त्यामुळे फिर्यादी महिलेच्या पतीने जखमी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी मदत केली.

याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन केले. त्यांना शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.