Chinchwad : लिफ्टच्या बहाण्याने तरुणाला लुटले

एमपीसी न्यूज – तरुणाला लिफ्ट दिली, मात्र रस्त्यात (Chinchwad) थांबवून दोघांनी त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल घेतला. हा प्रकार चिंचवड येथे मंगळवारी (दि.7) घडली.

या प्रकरणी प्रथमेश मनोरंजन जोशी (वय 32 रा. चिंचवड) याने फिर्याद दिली असून दोन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : हातात कोयते घेऊन टोळक्याची चायनीज सेंटर येथे दहशत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी लिफ्ट मागितली असता आरोपींनी त्यांच्या दुचाकीवरून लिफ्ट दिली असता. दोघांनी फिर्यादीला महावीर चौका जवळील ब्रीजवर नेत आरोपींनी दुचाकी थांबवली व फिर्यादी यांच्या खिशातील मोबाईल व रोख 10 हजार रुपये असा एकूण 14 हजार रुपयांचा ऐवज (Chinchwad) चोरला.

यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.