BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : आरती बेहनवालचे महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत यश

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयातील आरती बेहनवालच्या उत्कृष्ट कामगारीमुळे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.

चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेली आरती बहेनवालचा आज संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, मुख्यप्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, शारिरीक शिक्षण संचालक डॉ. आनंद लुंकड, पांडुरंग इंगळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

  • यावेळी शारिरीक शिक्षण संचालक डॉ. आनंद लुंकड म्हणाले, विशाखापट्टणम येथे (दि.16 ते 18 फेबु्रवारी दरम्यान) अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला क्रिकेट 36 षटकांच्या मर्यादित स्पर्धेत भारतातील आठ विद्यापीठातील पात्र संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या क्रिकेट लढतीत उत्तर प्रदेशच्या संघाने प्रथम फलंदाजी घेत सर्व गडी बाद 129 धावा काढल्या त्यात 6 षटके भेदक गोलंदाजी करीत एक गडी बाद करून 18 धावा दिल्या.

आमचे 4 फलंदाज बाद झाले असताना विजयासाठी 6 षटकांत 30 धावा जिंकण्यासाठी आवश्यक होत्या. तिच्या साथीला प्रज्ञा वीरकर दुसर्‍या बाजुने खेळत होती. कठीण परिस्थितीत आरतीने 18 धावा काढल्या. त्यात विजयी चौकार मारून संघाला सहा चेंडू राखून विजय मिळवून दिला. संघाला तेथील मान्यवरांच्या हस्ते भव्य चषक देण्यात आले. तिच्या अष्टपैलू कामगिरीमुळे सर्व संघातील खेळाडूंनी तिचे भरभरून कौतुक केले.

  • पुणे विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे महाजन, संघ प्रशिक्षिका सुरेखा दप्तरे, संघ नायिका आदिती काळे यांनीही आरती बहेनवालच्या अष्टपैलू कामगिरीचे कौतुक केले. पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर्व खेळाडूंना क्रीडा विभागाचे प्रमुख महाजन यांच्या हस्ते नुकतेच प्रशस्तीपत्रके देण्यात आली.

आज तिचा प्रतिभा महाविद्यालयात डॉ. दीपक शहा यांनी झालेल्या कौतुक सोहळ्यात विशेष कौतुक केले. आरती बहेनवाल या प्रतिभा महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असून, ती संत तुकारामनगर येथे वास्तव्यास असून तिचे वडील सुनील बहेनवाल हे संत तुकाराम नगर क्रिकेट प्रतिक्षक असून मुलींना क्रिकेटचे प्रशिक्षण देत आहे.

HB_POST_END_FTR-A2

.