Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी 116 जणांवर कारवाई

नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी तसेच वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे.

एमपीसी न्यूज – टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर नागरिक आता घराबाहेर पडत आहेत. मात्र अद्याप टाळेबंदी सुरू असल्याने अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. निर्बंध तोडणा-या नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत. रविवारी (दि. 2) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 116 जणांवर कारवाई केली आहे.

नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी तसेच वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे. तसेच अत्यावश्यक कारणांसाठी आणि परवानगी मिळालेल्याच नागरिकांनी प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रविवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (35), भोसरी (2), पिंपरी (4), चिंचवड (5), निगडी (0), आळंदी (1), चाकण (3), दिघी (12), म्हाळुंगे चौकी (2), सांगवी (19), वाकड (0), हिंजवडी (2), देहूरोड (1), तळेगाव दाभाडे (10), तळेगाव एमआयडीसी (1), चिखली (12), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (7)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.