Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी 229 जणांवर कारवाई

Action against 229 people in Pimpri-Chinchwad on Sunday

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात विविध पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 14) 229 जणांवर प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याची कारवाई करण्यात आली आहे. तर चाकण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये एकावर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी 33 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 18 पुरुष आणि 15 स्त्रियांचा समावेश आहे. तर 56 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 1 हजार 181 झाला आहे.

सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात दुपारी पाच वाजेपर्यंत 62 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या शहरातील रुग्णालयात 491 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तर सोमवारी दुपारी पाच वाजेपर्यंत 46 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार भोसरी एमआयडीसी (7), भोसरी (16), पिंपरी (10), चिंचवड (10), निगडी (0), आळंदी (0), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (0), वाकड (4), हिंजवडी (37), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (9), तळेगाव एमआयडीसी (5), चिखली (13), रावेत चौकी (1), शिरगाव चौकी (0) अशा एकूण 229 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.