Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 383 जणांवर कारवाई

Action against 383 people for violating administration order : पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत टाळेबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे केली.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने टाळेबंदीची घोषणा केली आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. मात्र, प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि. 26) 383 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांच्या कठोर टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. कठोर टाळेबंदीच्या कालावधीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत टाळेबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे केली.

मात्र, दहा दिवसांची कठोर टाळेबंदी संपल्यानंतर या कारवाईमध्ये सौम्यपणा आला आहे. कारवाईचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. पोलिसांच्या या कारवाईला नागरिक जुमानत नसल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे.

नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी तसेच वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत.

रविवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान  कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे -एमआयडीसी भोसरी (56), भोसरी (20), पिंपरी (16), चिंचवड (16), निगडी (12), आळंदी (2), चाकण (8), दिघी (40), म्हाळुंगे चौकी (8), सांगवी (29), वाकड (43), हिंजवडी (33), देहूरोड (13), तळेगाव दाभाडे (38), तळेगाव एमआयडीसी (00), चिखली (43), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (6).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.