Chinchwad : काळ्या काचांबाबत वर्षभरात तब्बल 40 हजार वाहनांवर कारवाई

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन(Chinchwad )करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई वर्षभर सुरु असते. कारवाई सातत्याने सुरु असताना देखील वाहन चालक सुधारण्याचे नाव घेत नाहीत. वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावणे बेकायदेशीर असताना देखील अनेक वाहने काळ्या काचा लाऊन फिरत असल्याचे दिसते.

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी मागील वर्षभरात तब्बल 40 हजार 917 वाहनांवर काचांना काळी फिल्म लावल्या प्रकरणी कारवाई केली आहे.

जानेवारी महिन्यात एक हजार 174 वाहनांवर कारवाई (Chinchwad )करत त्यांच्यावर 13 लाख 87 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वाहनांना काळ्या फिल्म लावल्या असतील तर त्या काढून टाकण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे.

मागील वर्षभरात पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने 40 हजार 917 केसेस करून त्यावर चार कोटी 44 लाख सात हजार 500 रुपये एवढा दंड आकारला आहे. वाहन मालकांच्या चुकांमुळे ही दंडाची रक्कम सरकारी तिजोरीत जमा होणार आहे.बीआरटी मार्गावरही पोलिसांची नजर

शहरात असलेल्या बीआरटी मार्गावर इतर खासगी वाहनांना परवानगी नाही. हे माहिती असताना देखील काही महाभाग जाणीवपूर्वक बीआरटी मार्गातून वाहने चालवतात. अशा 66 हजार 149 वाहनांवर वाहतूक पोलिसांनी मागील वर्षभरात कारवाई केली आहे. त्यांच्यावर चार कोटी 45 लाख 68 हजार 700 रुपये दंड आकारला आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील म्हणाले, “वाहतुकीच्या नियमांचे पालन प्रत्येक वाहन चालकाने केलेच पाहिजे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहतूक पोलिसांशी हुज्जत न घालता दंडाची रक्कम जमा करायला हवी.

मागील वर्षभरात वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे 60 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. शहरातील वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळल्यास ही रक्कम कमी होऊ शकेल. तसेच शहरातील वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाणही कमी होईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.