Chinchwad : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 62 दुकानदार, नागरिकांवर कारवाई

एमपीसी न्यूज – सरकारी आदेशाचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांच्या व्यतिरिक्त इतर दुकाने उघडी ठेवल्यास पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. याचबरोबर विनाकारण घराबाहेर मिळणाऱ्या नागरिकांवर देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. अशा 62 जणांवर पोलिसांकडून गुरुवारी (दि. 26) कारवाई करीत गुन्हे दाखल करण्यात आले.

एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. मात्र, जिल्हाधिका-यांच्या आदेशाकडे कानाडोळा करून काही दुकानदार दुकाने सुरूच ठेवत आहेत. त्या दुकानदारांना समजावण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. समज देऊनही दुकाने सुरु ठेवल्यास पोलिसांकडून संबंधित दुकानदारांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहेत.

19 मार्च रोजी 129, 20 मार्च रोजी 80, 21 मार्च रोजी 29, 22 मार्च रोजी 6, 23 मार्च रोजी 15, 24 मार्च रोजी 86, 25 मार्च रोजी 73, 26 मार्च रोजी 62 दुकानदार आणि नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

गुरुवारी करण्यात आलेली कारवाई –

एमआयडीसी भोसरी – 02
भोसरी – 07
पिंपरी – 03
चिंचवड – 05
निगडी – 08
देहूरोड – 03
आळंदी – 01
चाकण – 00
दिघी – 05
सांगवी – 03
वाकड – 08
हिंजवडी – 12
तळेगाव दाभाडे – 01
तळेगाव एमआयडीसी – 01
चिखली – 03
एकूण – 62

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.