Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरूच; शनिवारी 195 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासनाने आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून नागरिक घराबाहेर फिरत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाईची मोहीम सुरू आहे. शनिवारी (दि. 9) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 195 जणांवर कारवाई केली आहे.

शनिवारी सकाळी तळवडेतील एका महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यानंतर दिवसभरात पिंपरी-चिंचवड शहरातील च-होली, रुपीनगर, ताम्हाणेवस्ती, काळेवाडी आणि थेरगावातील 10 जणांचे तर पुण्यातील पण वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या दोघांचे असे 12 जणांचे रिपोर्ट शनिवारी सायंकाळी पॉझिटीव्ह आले. त्यामुळे दिवसभरात 13 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 77 झाली आहे.

शनिवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (3), भोसरी (27), पिंपरी (12), चिंचवड (8), निगडी (29), आळंदी (4), चाकण (2), दिघी (22), सांगवी (22), वाकड (17), हिंजवडी (16), देहूरोड (5), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (22), शिरगाव चौकी (6) एकूण 195 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.