Chinchwad Crime : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 124 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 20) 124 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 749 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 70 हजार 172 झाला आहे. तर दिवसभरात 11 जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

मात्र, नागरिक प्रशासनाच्या उपाययोजना आणि नियमांना पायदळी तुडवत आहेत. बहुतांश नागरिक नियमांचे पालन करीत आहेत. मात्र, काही लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती आहे.

रविवारी पोलिसांनी केलेली कारवाई –
एमआयडीसी भोसरी (9), भोसरी (17), पिंपरी (18), चिंचवड (7), निगडी (5), आळंदी (1), चाकण (1), दिघी (1), म्हाळुंगे चौकी (1), सांगवी (22), वाकड (16), हिंजवडी (17), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (2), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (7), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.