Chinchwad: लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 188 जणांवर कारवाई

Chinchwad: Action taken against 188 people for violating lockdown rules

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. 4) प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 188 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने पिंपरी-चिंचवड शहरात देखील काही निर्बंध घातले आहेत.

प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे नागरिक पालन करीत नाहीत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

गुरुवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार भोसरी एमआयडीसी (0), भोसरी (0), पिंपरी (17), चिंचवड (14), निगडी (1), आळंदी (8), चाकण (0), दिघी (10), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (31), वाकड (46), हिंजवडी (23), देहूरोड (16), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (20), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0) अशा एकूण 188 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.