Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 212 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोनवरी (दि. 11) 212 जणांवर कारवाई केली. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलिसांकडून ही कारवाई अविरत सुरू आहे.

पिंपरी चिंचवड शहरात अनेक भागात कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) तयार करण्यात आले आहेत. हे परिसर पूर्णतः सील करून लॉकडाऊनचे नियम कठोर करण्यात आले आहेत.

अशी परिस्थिती असताना नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरताना आढळून येत आहेत. ही बाब दररोज होणाऱ्या कारवाईच्या आकड्यावरून स्पष्ट होत आहे. पोलीस देखील न कंटाळता नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत.

सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (8), भोसरी (19), पिंपरी (16), चिंचवड (24), निगडी (27), आळंदी (7), चाकण (12), दिघी (15), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (33), वाकड (2), हिंजवडी (25), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (3), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (21), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0) एकूण 212 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.