Chinchwad: टाळेबंदीचे आदेश न पाळणाऱ्या 344 जणांवर कारवाई

Chinchwad: Action taken against 344 people for violating lockdown rules लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने टाळेबंदीची घोषणा केली आहे. यामध्ये नागरिकांच्या हालचालीवर मोठ्या प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत. मात्र या टाळेबंदीच्या आदेशाचे पालन न करता नागरिक विनाकारण घराबाहेर येत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात शनीवारी (दि. 25) 344 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दहा दिवसांचा कठोर लॉकडाऊन झाल्यानंतर प्रशासनाने काही प्रमाणात नियम शिथिल केले आहेत.

त्यामुळे कारवाईचा आकडा देखील खाली आला आहे. नियमभंग करणा-यांना पोलीस प्रसंगी काठीचा प्रसाद देखील देत आहेत.

नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी तसेच वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत.

शनिवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (47), भोसरी (16), पिंपरी (18), चिंचवड (22), निगडी (34), आळंदी (0), चाकण (0), दिघी (32), म्हाळुंगे चौकी (10), सांगवी (31), वाकड (13), हिंजवडी (23), देहूरोड (5), तळेगाव दाभाडे (21), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (59), रावेत चौकी (3,) शिरगाव चौकी (8)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.