Chinchwad: प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 348 जणांवर कारवाई

Chinchwad: Action taken against 348 people for violating lockdown rules कारमधून चालक आणि दोन प्रवाशांना आतापर्यंत परवानगी होती. मात्र त्यात बदल करत आता चालक आणि तीन जणांना कारमधून जाण्यास तसेच दुचाकीवर दोघांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने टाळेबंदीची घोषणा केली आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. मात्र प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी (दि. 29) 348 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 11 दिवसांचा आहे. हा कालावधी वाढून पुढे 14 ते 15 दिवसांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्याच वेळी 15 ऑगस्ट पर्यंत शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 50 हजार होईल, असा अंदाज देखील महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला आहे.

राज्य सरकारने वाहनांमध्ये जाणा-या लोकांच्या संख्येत वाढ केली आहे. कारमधून चालक आणि दोन प्रवाशांना आतापर्यंत परवानगी होती. मात्र त्यात बदल करत आता चालक आणि तीन जणांना कारमधून जाण्यास तसेच दुचाकीवर दोघांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी तसेच वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत.

मंगळवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (51), भोसरी (26), पिंपरी (12), चिंचवड (16), निगडी (26), आळंदी (0), चाकण (7), दिघी (52), म्हाळुंगे चौकी (3), सांगवी (12), वाकड (20), हिंजवडी (22), देहूरोड (13), तळेगाव दाभाडे (18), तळेगाव एमआयडीसी (3), चिखली (61), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (6)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.