Chinchwad: टाळेबंदीला न जुमानणाऱ्या 379 जणांवर कारवाई

Chinchwad: Action taken against 379 people for breaking lockdown ruls नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी तसेच वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने टाळेबंदीची घोषणा केली आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. मात्र प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (दि.28) 379 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची रुग्णसंख्या 12 हजार झाली आहे. शहरात सध्या रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 11 दिवसांचा होता. सध्या हा कालावधी वाढला असून हा कालावधी 14 ते 15 दिवसांपर्यंत जाईल. त्याच वेळी 15 ऑगस्टपर्यंत शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 50 हजार होईल, असा अंदाज महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी तसेच वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत.

मंगळवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (49), भोसरी (19), पिंपरी (32), चिंचवड (17), निगडी (30), आळंदी (1), चाकण (16), दिघी (46), म्हाळुंगे चौकी (2), सांगवी (24), वाकड (14), हिंजवडी (15), देहूरोड (4), तळेगाव दाभाडे (32), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (60), रावेत चौकी (7), शिरगाव चौकी (9)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.