Chinchwad: प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 413 जणांवर कारवाई

Chinchwad: Action taken against 413 people for violating administration order in lockdown प्रसंगी पोलिसांकडून काठीचा प्रसाद देखील नागरिकांना दिला जात आहे. मात्र पोलिसांच्या या कारवाईला नागरिक जुमानत नसल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने टाळेबंदीची घोषणा केली आहे. यामध्ये नागरिकांच्या हालचालीवर मोठ्या प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (दि. 19) 413 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांच्या कठोर टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे पोलिसांकडून केली जात आहे. या कालावधीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

प्रसंगी पोलिसांकडून काठीचा प्रसाद देखील नागरिकांना दिला जात आहे. मात्र पोलिसांच्या या कारवाईला नागरिक जुमानत नसल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

नागरिकांनी केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी तसेच वैद्यकीय कारणांसाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत.

रविवारी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये देहूरोड पोलिसांनी सर्वाधिक कारवाई केली आहे. देहूरोड पोलिसांनी एका दिवसात तब्बल 111 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.

रविवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (59), भोसरी (13), पिंपरी (15), चिंचवड (14), निगडी (19), आळंदी (1), चाकण (8), दिघी (39), म्हाळुंगे चौकी (1), सांगवी (22), वाकड (25), हिंजवडी (12), देहूरोड (111), तळेगाव दाभाडे (34), तळेगाव एमआयडीसी (6), चिखली (18), रावेत चौकी (8), शिरगाव चौकी (8).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.