Chinchwad : सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे सात हजार जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आजवर सुमारे सात हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर रविवारी (दि. 3) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 108 जणांवर कारवाई केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. या लॉकडाऊनची मुदत 17 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊन सोबतच संचारबंदीचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. मात्र शासनाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करीत दुकाने सुरू ठेवणाऱ्या, संचारबंदी आदेशाचा भंग करून मोकाट फिरणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी खंड पडू दिलेला नाही. दररोज कारवाई केली जात आहे. आजवर सुमारे सात हजार जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तरीही नागरिक घराबाहेर पडतच आहेत.

शनिवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (11), पिंपरी (4), चिंचवड (18), निगडी (7), म्हाळुंगे चौकी (4), सांगवी (14), वाकड (12), हिंजवडी (19), देहूरोड (4), तळेगाव एमआयडीसी (3), चिखली (9), शिरगाव चौकी (4) एकूण 108 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.