Chinchwad : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 90 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – सरकारी आदेशाचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांच्या व्यतिरिक्त इतर दुकाने उघडी ठेवल्यास पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरूच आहे. याचबरोबर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर देखील पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.  अशा 90 जणांवर पोलिसांकडून सोमवारी (दि. 30) कारवाई करण्यात आली आहे.

एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. मात्र,  जिल्हाधिका-यांच्या आदेशाकडे कानाडोळा करून काही दुकानदार दुकाने सुरूच ठेवत आहेत. त्या दुकानदारांना समजावण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. समज देऊनही दुकाने सुरु ठेवल्यास पोलिसांकडून संबंधित दुकानदारांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहेत.

सोमवारी करण्यात आलेली कारवाई –

पिंपरी – 11
चिंचवड – 07
निगडी – 03
चिखली – 01
देहूरोड – 09
तळेगाव दाभाडे – 12
तळेगाव एमआयडीसी – 00
सांगवी – 03
वाकड – 01
हिंजवडी – 05
भोसरी –  04
एमआयडीसी भोसरी – 14
दिघी – 06
आळंदी – 03
चाकण – 00
शिरगाव चौकी – 02
म्हाळुंगे चौकी – 09
एकूण – 90

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.