Chinchwad : पार्थ पवारांच्या सभेनंतर कार्यकर्त्यांची पाकीटमारी

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील पार्थ पवार यांच्या जाहीर सभेनंतर राष्ट्रवादीच्या आठ ते दहा कार्यकर्त्यांच्या खिशातील पाकीटे चोरीला गेली आहेत. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री नऊ सुमारास चिंचवड येथील वाल्हेकरवाडी येथे घडली.
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांची प्रचार सभा वाल्हेकरवाडी येथील एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेला शरद कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
  • या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सभेला आलेल्या आठ ते दहा कार्यकर्त्यांचा खिसा कापून पाकीटे चोरून नेली. कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या बाहेर पडल्यानंतर पाकीटमारी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.