Chinchwad: एरोबिक्स जिम्नास्टिक विश्वचषक स्पर्धा निवड चाचणीत वृंदा सुतार चौथी

एमपीसी न्यूज – एरोबिक्स जिम्नास्टिक विश्वचषक स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीत पिंपरी-चिंचवडची खेळाडू वृंदा सुतार हिने चौथा क्रमांक मिळवला. विश्वचषक स्पर्धेच्या निवड चाचणीत एवढी धडक मारणारी ती शहरातील पहिली खेळाडू ठरली आहे. 

अझरबाईन देशात बाकू शहरात 14 ते 16 मे दरम्यान होणाऱ्या एरोबिक्स जिम्नास्टिक विश्वचषक स्पर्धेची भारताची निवड चाचणी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी पार पडली. ह्या स्पर्धेत प्रथमच पिंपरी चिंचवडला संधी मिळाली होती. या स्पर्धेत वृंदा सुतार हिने 14.00 गुणांनी चौथ्या क्रमांकावर बाजी मारली. पहिल्या दोनच खेळाडूंची निवड बाकू येथील स्पर्धेसाठी होणार होती. पण तरी तिने या स्पर्धेसाठी उत्साहपूर्ण प्रदर्शन केले.

वृंदा सुतार ही हेवन स्पोर्टस क्लबची खेळाडू असून मागील 7 वर्षांपासून ती सातत्याने सराव करत आहे. क्लबमधील सर्व प्रशिक्षक व पालकांनी वृंदाच्या या यशाचे कौतुक केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या चाचणी स्पर्धेच्या परीक्षणासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण हर्षद कुलकर्णी यांनी परीक्षण केले. क्लबतर्फे क्षीतिजा राऊत यांनी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पाहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like