Chinchwad: आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त चंद्रकांत डोके यांचे निधन

एमपीसी न्यूज – आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त चंद्रकांत शिवराम डोके (वय 76) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

चंद्रकांत डोके आळंदी देवस्थानचे विश्वस्त होते. नररचना विभागातून सहाय्यक संचालक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते.  इंद्रायणी बचावत कृती समितीचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

काळेवाडीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज (गुरुवारी) सायंकाळी पाच वाजता अत्यंसंस्कार होणार आहेत. चिंचवड, लिंक रोड येथील निवासस्थानी अत्यंदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे.

माजी महापौर अपर्णा डोके यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात मुलगा कुमशेतचे माजी सरपंच योगेश डोके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष निलेश डोके, मुलगी डॉ. शुभश्री भोसले असा परिवार आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.