Chinchwad : आमच्यासाठी सर्वच नेते महत्त्वाचे – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – आमच्या लेखी सर्व भाजपमधील नेते हे (Chinchwad) महत्त्वाचे आहेत. राज ठाकरे यांनी याबाबत बोलू नये आम्हाला आमचे नेते किती महत्त्वाचे हे चांगले समजते, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगाविला.

चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्र, इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील पंप हाउस, चिंचवडमधील तारांगण प्रकल्प, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, बोऱ्हाडेवाडीतील शाळेची इमारत, मोशीतील सब फायर स्टेशन, रावेतमधील उद्यान, वायसीएम रूग्णालयातील सीएसएसडी प्रकल्प, ब क्षेत्रीय कार्यालयाची नवीन इमारत, कृष्णानगर येथे लॉन टेनिस कोर्ट, नेहरूननगर येथील शाळेची इमारत, इंद्रायणीनगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र, घरकुलमधील भाजी मंडईचे लोकार्पण, लाईट हाऊस प्रकल्पाचे उद्‌घाटन आणि भामा-आसखेड धरणाच्या जॅकवेल, चिंचवड, ऑटो क्‍लस्टर समोरील सात एकर जागेवर पर्यावरणपूरक 13 मजली प्रशासकीय इमारत, पिंपरीतील डेअरी फार्म पुल, मोशी, डुडुळगाव प्राथमिक शाळा इमारत, चोविसावाडीतील नवीन अग्निशामन केंद्र, घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राचे (Chinchwad) भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.

Chinchwad: विधानसभा अध्यक्षांना रिझनेबल टाईम समजतो – देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाय भाजपमध्ये कोणाला किती महत्त्व आहे यावर राज ठाकरे यांनी टिप्पणी केली होती. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या लेखी सर्व भाजपमधील नेते हे महत्त्वाचे आहेत. राज ठाकरे यांनी याबाबत बोलू नये आम्हाला आमचे नेते किती महत्त्वाचे हे चांगले समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.