Chinchwad: सर्वपक्षीय एकटवल्याने मताधिक्य घटले – लक्ष्मण जगताप

मित्र पक्ष बरोबर येऊनही मताधिक्य वाढायला हवे ते नाही वाढले

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षय एकटवले होते. ते एकटवले असले. तरी, मला 70 टक्के मते पडतील अपेक्षा होती. त्याऐवजी 60 टक्क्यांवर आली आहेत. मात्र, मताधिक्य मागच्यापेक्षा वाढल्याचे सांगत मित्र पक्ष बरोबर येऊनही जे मताधिक्य वाढायला पाहिजे होते ते वाढले नाही, अशी प्रतिक्रिया चिंचवडचे नवनिर्वाचित आमदार, भाजप शहारध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी विजयानंतर दिली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण जगताप 40 हजार मताधिक्याने निवडून आले आहेत. मात्र, मागीलवेळी पेक्षा 20 हजारांनी त्यांचे मताधिक्य घटले आहे. अपक्ष राहुल कलाटे यांनी जगताप यांना कडवी झुंज दिली.

विजयानंतर पत्रकारांशी बोलताना जगताप म्हणाले, शिवसेना आणि भाजपमध्ये थोडी धूसफूस होती. त्याचा पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघात फटका बसला आहे. चिंचवडमध्ये विजयावर परिणाम करु शकला नाही. पण, पिंपरीत परिणाम झाला आहे. चिंचवडमधील विजयात भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा वाटा आहे. स्वच्छ आणि निर्भळपणे निवडणूक लढलो असून लोकांनी मनापासून मत दिले आहे. पिंपरीतील पराभवाबद्दल दु:ख आहे. जनमताचा कौल मान्य आहे.

पुढील पाच वर्षात पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी नियोजन करणार आहे. गतकाळातील चूका दुरुस्त करणार असून लोकांसमोर जाताना लोक ज्या तक्रारी करत होते. त्याची एकही तक्रार राहणार नाही. याची दक्षता घेण्यात येईल, अशी ग्वाही जगताप यांनी दिली. पुणे जिल्ह्यात सर्व विरोधक एकटवले होते. भाजप विरुद्ध सर्व विरोधक अशी परिस्थिती होती. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला फटका बसल्याचेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.