Chinchwad : ‘रात्री दीडपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी द्या’

पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनची पिंपरी चिंचवड पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पुणे आणि राज्यातील मोठ्या (Chinchwad) शहरांच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड मधील हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. असोसिएशनच्या वतीने पिंपरी चिंचवडचे सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी व कार्याध्यक्ष गोविंद पानसरे यांच्या सह्या आहेत. निवेदन देताना असोसिएशनचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, उपाध्यक्ष रमेश तापकीर, सचिव सत्यविजय तेलंग, हरीश शेट्टी, कार्यकारणी सदस्य सुमित बाबर, शंकर चक्रवती, विजय शेट्टी, अभिषेक शेट्टी, जगदीश शेट्टी आदी उपस्थित होते.

असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड पोलिसांनी आयुक्तालय हद्दीतील हॉटेल आस्थापनांसाठी स्वतंत्र वेळेच्या संदर्भात परिपत्रक काढावे. या मागणीबाबत असोसिएशनकडून मागील तीन ते चार वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. मात्र याबाबत पोलीस आयुक्तांकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे हॉटेल आस्थापनांच्या वेळेबाबत अनिश्चितता व संभ्रम निर्माण झाला आहे.

Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियान

काही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस हॉटेल व्यवसायिकांना रात्री दहा तर काही ठिकाणी अकरा वाजता हॉटेल व रेस्टॉरंट सक्तीने बंद करण्यास भाग पाडतात. काही ठिकाणी व्यवस्थापकांना दमदाटी व मारहाण झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

पिंपरी चिंचवड हे पुण्याचे उपनगर व अविभाज्य भाग आहे. पुणे शहराला राज्य शासनाच्या परिपत्रकांन्वये मध्यरात्री दीड वाजेपर्यंत खाद्यपदार्थ व मद्य पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये हा नियम लागू आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी दोन शहरांमध्ये तफावत न करता पिंपरी चिंचवड हद्दीतील हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.