Chinchwad : प्रजासत्ताक दिनानिमित्त एएमसीकडून वीर सावरकर गुरुकुलला मदतीचा हात

एमपीसी न्यूज – प्रजासत्ताक दिनानिमित्त अव्हेंजर मोटारसायकल क्लब (एएमसी) कडून वीर सावरकर गुरुकुल या संस्थेला मदतीचा हात दिला. त्यामध्ये धान्य आणि आर्थिक स्वरूपात मदत करून त्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला.

दुचाकीवर फिरणा-या सफर प्रेमींची ही एएमसी संस्था आहे. पुण्यासह संस्थेच्या नाशिक, औरंगाबाद, बेंगलोर, कोल्हापूर, दिल्ली इत्यादी शहरांमध्ये शाखा आहेत. रोजच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनातून वेळ काढून दुचाकीवरून सैर करणे आणि त्यातून आयुष्याचा आनंद घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. एएमसी संस्थेने पुणे ते लेह, पुणे ते कन्याकुमारी अशा मोठ्या सफरी दुचाकीवरून केल्या आहेत.

वीर सावरकर गुरुकुल या संस्थेला प्रजासत्ताक दिनानिमित्त एएमसीच्या सदस्यांनी भेट दिली. गुरुकुलला धान्य आणि रोख रकमेच्या स्वरूपात मदत केली. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या वृत्तीने हा मदतीचा हात देण्यात आला आहे. यापूर्वी एएमसीने महिला मंडळ मुळशी, गुरुकुल पुणे कॅम्प व अन्य ठिकाणी भेटी देऊन त्या संस्थांना मदत केली आहे. एएमसीने तळेगाव व चतुःशृंगी येथील टेकड्यांवर वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.