Chinchwad: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका सहाय्यक निरीक्षकाला कोरोनाची लागण

Chinchwad: An Assistant Inspector at Pimpri-Chinchwad Police Commissionerate found corona affected पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या आता 14 झाली आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. आयुक्तालयात आतापर्यंत 14 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

शुक्रवारी (दि.19) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर दोन दिवसांनी आज (रविवारी) आणखी एका अधिकाऱ्याला लागण झाली. रविवारी आलेल्या चाचणी अहवालात संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा अहवाल आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या आता 14 झाली आहे. त्यातील आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. घरी सोडलेले पोलीस पूर्ण उपचारानंतर कामावर रुजू देखील झाले आहेत. आता सहा पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.